Home Maharashtra आता विदर्भाचा नंबर । हवामान खात्याकडून विदर्भाला ऑरेंज अलर्ट, चंद्रपूर -गडचिरोलीत अतिवृष्टी...

आता विदर्भाचा नंबर । हवामान खात्याकडून विदर्भाला ऑरेंज अलर्ट, चंद्रपूर -गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार

नागपूर ब्युरो : विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. हवामान खात्याकडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ‘चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर, नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाचे संचालक मोहनलाल शाह यांनी ही माहिती दिलीय. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर शहरात 5 वाजेपर्यंत 148 मिमी पाऊस झाला असून कोलार नदीला आलेल्या पुरामुळे काही कुटुंबांना रात्री उशिरापर्यंत नगर परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. 

चिपळूण चा पूर
दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना

राज्यभरात आज पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा

एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळाधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे विदर्भातंही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी सांगितलं.

चंद्रपूरमध्ये मुसळधार

चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरु होती. साडेबाराच्या सुमारास पावसाने पुन्हा वेग पकडला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत धान पिकाला अशाच मोठ्या पावसाची गरज होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 42 टक्के एवढा पाऊस पडलाय. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून 500 क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडला जाणार आहे. पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना व शेतीला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प 75 टक्के भरला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

उल्हास नदीच्या पुरात 70 जनावरं अडकली

बदलापूरमध्ये उल्हास नदीनं विक्राळ रुप धारण केलंय. उल्हास नदीच्या या पुरात जवळपास 70 जनावरं अडकली आहेत. बदलापूरच्या पाणवठा आश्रमात ही जनावरं आहेत. गाई घरात, तर कुत्री बेडवर अशी परिस्थिती तयार झालीय. एकूणच या पुराच्या तांडवाने नागरिक हैराण झालेत. पुराचा मोठा फटका अपंग प्राण्यांच्या आश्रमाला बसलाय. त्यामुळे चामटोलीच्या या अपंगा प्राण्यांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न होतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे. यानंतर आमदार कथोरे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीय.