Home मराठी Maha Metro । झिरो माईल फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनला...

Maha Metro । झिरो माईल फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनला ‘सीएमआरएस’चे प्रमाणपत्र

नागपूर ब्यूरो : वर्धा मार्गावरील ऑरेंज लाईन व हिंगणा मार्गावरील प्रवासी सेवा सुरु असून लवकरच सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन प्रवासी सेवा करिता सज्ज झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी झिरो माईल फ्रीडम पार्क व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले असून लवकरच येथे प्रवासी सेवा सुरु होईल.

दिनांक 3 ते 5 ऑगस्ट 2021 रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी या दोन्ही मेट्रो स्टेशनची पाहणी करत स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे निरीक्षण केले. स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा सोबत संरक्षा व सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने यावर समाधान व्यक्त केले होते.


झिरो माईल फ्रिडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क हे दोन्ही देशाच्या मध्यभागी असलेले केंद्रबिंदू असून या दोन्ही परिसरांचा ऐतिहासिक वारसा आहे, ज्यामध्ये रिजर्व बँक ऑफ इंडीया, कस्तुरचंद पार्क, सिताबर्डी किल्ला अश्या प्रमुख आणि ऐतिहासिक स्मारक आणि संस्थाने आहेत. या व्यतिरिक्त या परिसरात मोठी बाजारपेठ, शासकीय कार्यालय, हॉस्पिटल, व्यापारी संकुल, कॉलेज, असल्यामुळे या भागात सतत नागरिकांची रहदारी असते त्यामुळे सदर मेट्रो स्थानक प्रवासी सेवे करिता खुले झाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन

झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशनच्या माध्यमाने सिव्हिल लाईन परिसरात पोहचण्याकरिता सोईचे होणार आहे. झिरो माईल स्टेशन 20 मजली असेल आणि यात 4 वाहन तळचा समावेश असेल. स्टेशन कॉनकोर्स परिसरात तिकीट विक्री केंद्र आणि किरकोळ विक्री दुकानांकरिता गाळ्यांची तरतूद करण्यात आली आहे. 13 मजल्यांचा वापर व्यावसायिक कामाकरिता केला जाईल.

कस्तुरचंद पार्क स्टेशन

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या मदतीने सदर भागात पोहचणे सोपे होणार आहे. सदर हा शहराचा प्रमुख व्यावसायिक भाग आहे. या स्टेशन मध्ये प्रवाश्यांकरिता विविध आवश्यक सोई – सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरून कॉनकोर्स भागात जाण्याकरिता आणि येथून प्लॅटफॉर्मवर जाण्याकरिता दोन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत.

महा मेट्रोने स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरीता प्रसाधानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केयर रूम, दिव्यांगाकरिता विशेष प्रसाधन गृह, मार्गदर्शिका, सूचना बोर्ड इत्यादीची व्यवस्था देखील केली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने एएफसी गेट, इंमरजंसी कॉल पॉईंट, प्लेटफार्म परिसरातील इंमरजंसी स्टॉप प्लंगर, लिफ्ट आणि एस्केलेटर अश्या अनेक सुविधा उपलब्ध असून लवकरच झिरो माईल फ्रीडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु होणार आहे.