मुंबई ब्युरो : तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 9, 2021
496 पदांसाठी राबवली जाणार प्रक्रिया
तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.