मुंबई ब्यूरो : बुधवार 13 ऑक्टोबर हा शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस आहे. देवी महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते. जे संपूर्ण नवरात्रीसाठी उपवास ठेवू शकत नाहीत, ते अष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून देवी महागौरीची पूजा करतात. देवी महागौरीला हलवा आणि पुरी आवडते, म्हणून या दिवशी हलवा-पुरी आणि काळा हरभरा बहुतेक घरांमध्ये प्रसाद म्हणून बनवला जातो. याशिवाय, देवीला नारळही अर्पण केले जाते. जर तुम्हालाही नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास ठेवता आला नसेल तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही आईची विशेष पूजा करुन तिचे आशीर्वाद घेऊ शकता. उपासना करण्याची पद्धत आणि महागौरीच्या पूजेचे महत्त्व जाणून घ्या –
अशी पूजा करा
सर्वप्रथम गंगाजलने पूजास्थळ पवित्र करा. जमिनीवर चौरस बनवा आणि नंतर चौकी किंवा पाटा ठेवा. त्यावर लाल कपडा घालून त्यावर देवीचा फोटो ठेवा. तसेच श्री गणेश, वरुण आणि नवग्रह देखील ठेवा. या दिवशी दिवीच्या चित्रासमोर असलेल्या मातीच्या गौर नक्कीच ठेवावे. मातीचे गौर हे माता पार्वतीचे महागौरी रुप मानले जाते. यानंतर, गणपतीची पूजा करा आणि देवी आणि महागौरीचे प्रतीक असलेल्या गौरला सात वेळा कुंकू अर्पण करा आणि विवाहित स्त्रियांनीही त्यांच्या भांगेतही ते भरावे. यानंतर धूप, दीप, अक्षता, फुले इत्यादी देवीला अर्पण करावे. यानंतर शिरा, हरभरा आणि पुरीचे नैवेद्य अर्पण करा. मग सप्तशती मंत्रांने देवी महागौरीची पूजा करावी. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करणेही शुभ मानले जाते.
पूजेनंतर यज्ञ करा –
पूजेच्या वेळी, एक यज्ञ कुंड घ्या त्यात शेणाच्या गवऱ्या जाळून सात, अकरा, एकवीस किंवा एकशे आठ वेळा मातेचा मंत्र वाचून हवन सामुग्रीची आहुती द्या. आहुती अर्पण करण्यापूर्वी हवन सामग्रीमध्ये धान्य, तूप, बताशा, कापूर इत्यादी मिसळा. यामुळे देवीला आनंद तर होतोच, पण घरातील नकारात्मकताही दूर होते. शेवटी, आईची आरती म्हणा आणि पूजेच्या वेळी झालेल्या चुकीबद्दल तिची माफी मागा.
स्त्रियांना सौभाग्य आणि पतीला दीर्घायुष्य लाभते
महागौरीची पूजा केल्याने स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते आणि पतीला दीर्घायुष्य लाभते. तर अविवाहित मुलींना मनाप्रमाणे नवरा मिळतो. असे मानले जाते की जे लोक विधीवत माता महागौरीची पूजा करतात, त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते.
अष्टमीच्या दिवशी कन्यापूजाही करता येते
साधारणपणे नवरात्रीला नवमीच्या दिवशी लोक नऊ मुलींना त्यांच्या घरी बोलावून त्यांची पूजा करतात आणि त्यांना दक्षिणा, भेटवस्तू देतात. पण, तुम्ही अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन देखील करु शकता. हे सर्वोत्तम देखील मानले जाते. कन्या पूजेमध्ये, लक्षात ठेवा की मुलगी दोन वर्ष ते दहा वर्षांच्या दरम्यान असाव्यात.