Home Diwali @VarshaEGaikwad | महाराष्ट्रातील शाळांना 14 दिवसांची सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

@VarshaEGaikwad | महाराष्ट्रातील शाळांना 14 दिवसांची सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

587

मुंबई ब्यूरो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या काळात शाळांकडून सुरु असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबरोबर त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन दिवाळी सुट्टीची माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरु झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सावासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना 28 ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

शाळा सुरु, कॉलेज सुरु, मग क्लासेस बंद का?

महाराष्ट्र सरकार आता राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. पहिली ते चौथीचे वर्ग देखील सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचं कळतंय. महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होत असताना कोचिंग क्लासेसला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी क्लासेसचे संचालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमधील क्लासेस चालवणाऱ्या संचालकांनी विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. कोचिंग क्लासेस सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

अद्याप कोचिंग क्लासेसच बंद का?

शाळा सुरु, महाविद्यालये सुरु,थिएटरंही सुरु झाली आहेत, मग कोचिंग क्लासेस बंद का? हा सवाल नागपुरातील क्लासेसच्या संचालकांनी उपस्थित केलाय. क्लासेस सुरु नसल्याने विद्यार्थी स्पर्धेमध्ये मागे पडतात, शिवाय कोचिंग क्लासेस आर्थिक संकटात आलेय. असं म्हणत क्लासेस सुरु करण्याची मागणी क्लासेस संचालकांनी केलीय. कोचिंग क्लासेस सुरु केले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय ‘सरकार जगाव वाणिज्य बचाव’चे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी दिला आहे.

#PAKODEWALA | पकोड़े खाने हैं तो अब चले आइए न्यू नागपुर के मनीष नगर