मुंबई ब्युरो : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित कोर्टात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील अँटिलिया स्फोटके प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात 100 कोटी वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले जात असल्याच्या गंभीर आरोपाचा समावेश होता. देशमुख यांच्यावर वसुलीबाबतचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाणे आणि मुंबईत सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
#maharashtra । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा पगार थांबवला; फरार घोषित करणार