Home Congress #Gadchiroli। काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते सगुणा तलांडी यांचे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

#Gadchiroli। काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते सगुणा तलांडी यांचे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

533
गडचिरोली ब्युरो : आज गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पक्ष नोंदणी सभासद कार्यक्रम नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातून शुभारंभ झाला यावेळी अनेक जुने कार्यकर्ता व नेत्यांना जोडण्याचे काम नाना पटोले यांनी केले.

एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणारा सिरोंचा तालुक्यातील माजी आमदार पेटा रामा तलांडी त्यांची धर्मपत्नी सगुना तलांडी यांनी दोन वर्षे अगोदर भाजप पक्षात प्रवेश केला होता परंतु आज पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी म्हणून सगुना तलांडी यांच्या प्रवेश झाला यावेळी सगुणा तलांडी आपल्या दोन मुलींसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एक पाठबळ मिळणार व नाना पटोले विजय वडेट्टीवार यांनी सगुना तलांडी यांचे अभिनंदन केले.

यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी सह काँग्रेसचे सर्व बडे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.