Home Maharashtra @kolhe_amol । अमोल कोल्हे म्हणाले- एकांतवासात जातोय, घेतलेल्या निर्णयांचा विचार, कदाचित फेरविचार...

@kolhe_amol । अमोल कोल्हे म्हणाले- एकांतवासात जातोय, घेतलेल्या निर्णयांचा विचार, कदाचित फेरविचार करणार!

550

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची एक फेसबूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. आपल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. एकांतवास घेतल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचीत फेरविचार करणार असल्याचे कोल्हे यांनी म्हणले आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाले अमोल कोल्हे?

“सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय…थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!!

टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही