Home Legal @msrtcofficial । एसटी महामंडळाची मोठी कारवाई: राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचारी निलंबित!

@msrtcofficial । एसटी महामंडळाची मोठी कारवाई: राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचारी निलंबित!

570

मुंबई ब्युरो : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 45 आगारातील 376 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केले आहे. मात्र, या निलंबनाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

अवमान याचिका दाखल करणार- अनिल परब

एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. महामंडळाने देखील आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमीका घेतली असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे एका दिवसाचे काम नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका सोडावी. नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहनही परब यांनी कर्मचाऱ्यांना केले होते.

@nawabmalikncp । मलिक म्हणाले- आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू; उद्या सकाळी पर्दाफाश करणार