नागपूर ब्युरो : शनिवार, दिनांक 13/11/2021 रोजी सायंकाळी नागपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख आणि व्यापार क्षेत्रात रुट मार्च काढला. मेश्राम पुतळा चौक पो. स्टे. सदर येथून पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 2 विनिता साहू यांचे उपस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास आवाहन करण्यासाठी 1 एसीपी , पोलीस स्टेशन सीताबर्डी, सदर, धंतोली, मानकापूर , गिट्टीखदान, अंबाझरी येथील 7 पोलीस निरीक्षक, 18 अधिकारी, 60 पोलीस अमलदार आणि नागपूर शहरातील दंगा नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथक , वाहतूक विभाग यांचे सह फ्लॅग मार्च घेऊन पीए सिस्टम द्वारे आवाहन करण्यात आले.
Foot and Vehicle Root March across Zone II Nagpur City
— Vinita Sahu IPS (@IamVinitaa) November 13, 2021
In order to maintain peace and tranquility in the city a route march was conducted by me along with ACP Sadar, all Sr PIs officers, platoon of RCP , QRT along with all the DB teams ,Beat Marshalls@NagpurPolice #Nagpur pic.twitter.com/3H5zhH6acQ
सदर रूट मार्च मेश्राम पुतळा चौक येथे सुरू होऊन मंगळवारी बाजार गड्डी गोदाम , एल आय सी चौक, आरबीआय चौक , झीरो माईल, धंतोली मार्केट परिसर, धरमपेठ, गोकुल पेठ, अंबाझरी, गिट्टीखदान मानकापूर हद्दीतून पुन्हा मेश्राम पुतळा चौक येथे रूट मार्च काढण्यात आला.
#Gadchiroli | गडचिरोलीत पोलिस, नक्षलींमध्ये चकमक; 26 नक्षलवाद्यांचा खात्मा