Home Legal @AnilDeshmukhNCP । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ

@AnilDeshmukhNCP । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ

533

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपली होती. यामुळे त्यांना आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीच्या वकिलांकडून अनिल देशमुखांची कोठडी तीन दिवसांसाठी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्र चौकशी करायची आहे असे कारण देत ईडीने कोठडी वाढवून घेण्याची मागणी केली. यानंतर देशमुखांच्या कोठडीमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

#Maharashtra । भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार : नवाब मलिक