गडचिरोली ब्युरो : गडचिरोली पोलिसांना आज मोठे यश मिळाले आहे. येथील ग्यारापत्ती कोटगूल जंगलात पोलिस आणि नक्षलींमध्ये चकमक उडाली. यात 26 नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. नक्षलींचा शोध घेण्यासाठी C-60 पथकाचे जवान जंगलात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5 ते 6 दरम्यान शोध सुरू असताना अचानक चकमक उडाली. यात मोठ्या प्रमाणात नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. बातमी लिही पर्यंत 26 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आले.
ऐतिहासिक यश
उल्लेखनीय आहे की गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या चकमकित मिळालेल्या यशात आजचे यश हे ऐतिहासिक ठरले आहे. एकाच वेळी तब्बल 26 नक्षल्यांचा खात्मा करण्याची ही गडचिरोली जिल्ह्याची दुर्मिळ घटना आहे.
माजी पोलिस अधिकाऱ्यांनी केले अभिनंदन
मुख्य म्हणजे आजच्या या ऐतिहासिक कार्रवाई साठी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व माजी पोलिस अधिकाऱ्यांनी टीम चे अभिनंदन केले आहे.
#Amravati | अमरावती में हिंसा के विरोध में बुलाए बंद के दौरान हुआ पथराव और लाठीचार्ज, कई घायल