Home Health #Health । सुविधा असलेल्या रुग्णालयांत सूर्यास्तानंतरही पोस्टमॅार्टेम शक्य, रात्रीच्या पोस्टमॅार्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

#Health । सुविधा असलेल्या रुग्णालयांत सूर्यास्तानंतरही पोस्टमॅार्टेम शक्य, रात्रीच्या पोस्टमॅार्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

550
पुरेशा पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांत आता सूर्यास्तानंतरही पोस्टमॅार्टेम करता येईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्टमॅार्टेम प्रक्रियेसाठी नवीन प्रोटोकॉलची अधिसूचना काढली आहे. ती तत्काळ प्रभावाने लागूही झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, नव्या प्रक्रियेमुळे अवयवदानाला चालना मिळेल. प्रोटोकॉलमध्ये म्हटले आहे की, अवयवदानासाठी प्राधान्याने पोस्टमॅार्टेम केले जावे. अशा प्रकारच्या पोस्टमाॅर्टेमसाठी आवश्यक पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांत ते सूर्यास्तानंतरही केले जावे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली.

रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या पोस्टमॅार्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
कोणताही संशय दूर करण्यासाठी व कायदेशीर कारणांमुळे रात्री होणाऱ्या सर्वच पोस्टमाॅर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. तथापि, जोवर कायदा व व्यवस्थेची स्थिती नसेल तोवर हत्या, आत्महत्या, बलात्कार, िछन्नविच्छिन मृतदेहासारख्या श्रेणीअंतर्गत रात्रीच्या वेळी पोस्टमाॅर्टेम करण्यात येणार नाही.