जगभरात हजारो बेट (Island) आहेत जे अत्यंत सुंदर आहेत. अशा बेटांवर जाण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर जगात असेही काही बेट आहेत, जे खूप कमी लोकांना माहिती असतात. पण त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप कमी लोकांना संधी मिळते. ब्राझीलमध्ये (Brazil) एक बेट असं आहे जिथे रोज फक्त 420 लोकांनाच जाण्यासाठी परवानगी मिळते. ब्राझीलमधील या बेटाचं नाव आहे, फर्नांडो दी नोरोव्हा (Fernando Di Norova). या बेटाची निर्मिती ज्वालामुखीतून झाल्याचं सांगितलं जातं. या बेटाचं नाव आणि त्यामागील कहाणी जाणून घेतल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत.
फर्नांडो दी नोरोव्हा हे प्रत्यक्षात एक बेट नाही, तर बेटांचा समूह आहे, जो अनेक छोट्या-छोट्या बेटांनी बनलं आहे. या बेटाचा अर्ध्याहून अधिक भाग संरक्षित राष्ट्रीय समुद्री वन आणि अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. 16 व्या शतकात हे बेट सर्वात प्रथम पोर्तुगिजमधील एक खलाशी फर्नांडो दी नोरोन्हा याने शोधलं होतं. त्यामुळे या बेटाचं नावही त्याच्या नावानेच ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.
मुख्य बेटाचा वापर हा तुरुंग म्हणून केला जात होता
फर्नांडो दी नोरोव्हाचे मुख्य बेट हे 28.5 वर्ग किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे. ईसवी सन 1700 पासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत या मुख्य बेटाचा वापर हा तुरुंग म्हणून केला जात होता. या तुरुंगात ब्राझीलमधील कैद्यांना ठेवलं जात होतं. या कैद्यांमघध्ये चोरांपासून ते हत्येच्या दोषींचा समावेश होता. हे बेट एकप्रकारे जगापासून वेगळं समजलं जात होतं त्यामुळे इथे मोठ्या गुन्ह्यातील दोषींना ठेवलं जात गोतं. या बेटावर आजही जुने तुरुंगाचे अवशेष पाहायला मिळतात.
कैद्यांचे वंशज आजही या बेटावर
असं सांगितलं जातं की या बेटावरील तुरुंगात शिक्षा भोगलेले काही लोक पुन्हा आपल्या घरी परत गेले नाहीत. त्यांनी या बेटालाच आपलं घर बनवलं. त्या कैद्यांचे वंशज आजही या बेटावर राहतात. इथलं शांत वातावरण, हिरवाई आणि सुंदरतेमुळे हे लोक कधी आपल्या मुळ ठिकाणी परतलेच नाहीत. आता तर या बेटाची सुंदरता एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नसल्याचं लोक सांगतात. त्यामुळेच लोक फर्नांडो दी नोरोव्हा या बेटावर जाण्यासाठी उत्सुक असतात.