Home Covid-19 #Maharashtra । राज्यात ओ-मायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, सध्या तरी लॉकडाऊनची नाही

#Maharashtra । राज्यात ओ-मायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, सध्या तरी लॉकडाऊनची नाही

524
दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटमुळे जगभराची चिंता वाढली आहे. असे असताना पुन्हा लॉकडाऊन लावले जाणार का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. सध्या तरी लॉकडाऊनची कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. असे टोपे यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात एकही ओ-मायक्रॉन या व्हेरिंएटचा एकही रुग्ण नाही, या नव्या व्हेरिंएटमुळे जनतेला असे वाटत होते की, पुन्हा लॉकडाऊन लावले जाणार, मात्र सध्या तरी लॉकडाऊनची कोणत्याही प्रकारे तयारी नाही. परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला घरी सोडण्यात येईल. असे टोपे म्हणाले.

नियम पाळण्याचे आवाहन

कोरोनाच्या नव्या ओ-मायक्रॉन या व्हेरिंएटमुळे प्रत्येकाच्या मनात धास्ती भरली आहे. असे असताना प्रत्येकाने खबरदारी घेत सावध राहावे, शासनाने लादलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. असे राजेश टोपे म्हणाले.

सध्या तरी लॉकडाऊनची घोषणा नाही

सध्या तरी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे निर्बंध लावण्याची घोषणा केलेली नाही. मात्र जनतेने कोरोनासंबधी पालन करणे आवश्यक आहे. नियमित मास्क घाला, जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्या. असे आवाहन टोपे यांनी केले आहे.