नागपुर ब्यूरो : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे संपुर्ण शहरात एकुण ८ मैदानावर क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येत आहेत. सर्व टुर्नामेंट उद्या दिनांक ०६/१२/२०२१ पासुन सुरु होत आहे.
दक्षिण-पश्चिम नागपुरात साहस मैदान, छत्रपती नगर, दक्षिण नागपुरात महावीर नगर मैदान, पुर्व नागपुरात सरदार वल्लभभाई पटेल मैदान (कच्छी वीसा ग्राउंड) लकडगंज,मध्य नागपुरात चिटणीस पार्क मैदान, पश्चिम नागपुरात शिवाजी क्रिडा मंडळ, गांधीनगर, उत्तर नागपुरात मनमोहन मैदान, अशोकनगर येथे होणार आहेत. तसेच विद्यार्थी आघाडीतर्फे युनीवर्सिटी ग्राउंड, रविनगर व युवा वॅारियरकरीता यशवंत स्टेडीयम, धंतोली येथे होणार आहे.
हे सर्व टुर्नामेंट मंडळ स्तरावर होणार आहेत. ज्यामध्ये प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २१ हजार रूपये, तृतीय पारितोषिक ११ हजार रूपये इतके आहेत. मंडळ स्तरावरून जो संघ विजयी होईल तो संघ शहराच्या क्रिकेट टुर्नामेंटकरीता पात्र असेल.
शहरच्या टुर्नामेंटचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५१ हजार रूपये, तृतीय पारितोषिक ३१ हजार रूपये असणार आहे. टुर्नामेंटच्या आयोजनाकरीता भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, सर्व आमदार व भाजपा मंडळ अध्यक्षांसहीत, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्कमंत्री मनिष मेश्राम यांच्या नेत्रृत्वात स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
मंडळ स्तरावर मंडळ अध्यक्ष यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, युवा वॅारियर संयोजक यश शर्मा यांच्या नेतृत्वात होणार आहेत.