Home Covid-19 4 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 30 नवीन संक्रमित आढळले, महाराष्ट्रात 8 ; देशात नवीन...

4 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 30 नवीन संक्रमित आढळले, महाराष्ट्रात 8 ; देशात नवीन व्हेरिएंटचे 143 प्रकरणे

555

देशाच्या 4 राज्यांमध्ये शनिवारी ओमायक्रॉनची एकूण 30 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात 8 कर्नाटकात 6, केरळमध्ये 4 आणि तेलंगणात 12 ओमायक्रॉन संक्रमित आढळले आहेत. खरेतर येथे अद्याप 3 लोकांचा रिपोर्ट पेडिंग आहे. देशात आता ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 143 झाली आहे.

देशात सर्वात जास्त ओमायक्रॉन संक्रमित सध्या महाराष्ट्रात (48) आहेत. मुंबईत आज पुन्हा 4, साताऱ्यात 3 आणि नागपुरात 1 केस सापडल्याची पुष्टी झाली आहे. तर कर्नाटकात सापडलेले 6 संक्रमित दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या दोन मेडिकल संस्थांमध्ये सापडले आहेत.

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन ब्रिटेनमध्ये झपाट्याने पाय पसरवत आहे. येथे आतापर्यंत याचे 24,968 केस आढळले आहेत. तर यामुळे संक्रमत 7 लोकांचा मृत्यूही झालेला आहे. ब्रिटेनच्या आरोग्य सुरक्षा एजेंसीने शनिवारी सांगितले की, 17 डिसेंबरला 24 तासात एकूण 10 हजार नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यावरुन समजते की, नवीन व्हेरिएंट किती झपाट्याने परसत आहे. रुग्णालयात सध्या नवीन व्हेरिएंटच्या 85 रुग्णांवर उपचार सुरु आहे.