Home Maharashtra कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी होतेय वाढ, जानेवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता :...

कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी होतेय वाढ, जानेवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता : नवाब मलिक

512

देशासह राज्यावर ओमायक्रॉन या नवीन कोरोना व्हेरिएंटचे संकट आहे. दरम्यान या नवीन व्हेरिएंटचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे गुरुवारीच निश्चित झाले. त्यानुसार शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित केले जातील. याबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, गुरुवारी कॅबिनेटमध्ये कोविडविषयी चर्चा करण्यात आली. कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी वाढ होत आहे. कॅबिनेटमध्ये आराखडा देत असताना हे लक्षात आले. तसेच ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे जानेवारीमध्ये तिसरी लाट येऊ शकते अशी माहिती देखील नवाब मलिकांनी दिली आहे. तसेच हायकोर्टाने सांगितलं आहे की तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायली हवी. जर निवडणूका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. पंजाबमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते असे देखील मलिक म्हणाले. तसेच आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असेही मलिक म्हणाले.