Home हिंदी शिवबाच्या रायगड किल्याच्या धर्तीवर राहणार छत्रपती चौक मेट्रो स्टेशन

शिवबाच्या रायगड किल्याच्या धर्तीवर राहणार छत्रपती चौक मेट्रो स्टेशन

772

नागपूर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अँक्वा लाईन मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. तसेच शहरातील अन्य मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु आहे. नागपूर शहराच्या स्वरूपा सोबतच नागरिकांना सर्व सोयी सुविधा युक्त वाहतूक सेवा उपलब्ध करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . ब्रिजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्व वाढवण्यासोबतच प्राचीन धरोहराला जपण्याचा निर्णय घेतला त्याच अनुषंगाने स्टेशनचे निर्माण कार्य देखील सुरु आहे.

ऑरेंज लाईन मार्गिकेवरील छत्रपती मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु असून आता पर्यंत 75 % कार्य पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र भूषण आणि स्वराज्याचा नारा बुलंद करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने वर्धा मार्ग स्थित छत्रपती चौकाचे नामकरण काही वर्षां पूर्वी केल्या गेले होते। छत्रपती चौकाच्या नावाने निर्माण होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाचे डिजाईन शिवरायाच्या सर्वात महत्वपूर्ण किल्ला ‘रायगड’ च्या धर्तीवर बनविण्यात आले आहे.


दक्षिण-पश्चिम नागपूर साठी महत्वाचा
दक्षिण-पश्चिम नागपूरच्या भौगोलिक दृष्टीकोनाने हा चौक खूप महत्वाचा आहे. देव नगर, स्नेह नगर, प्रताप नगर, टेलिकॉम नगर, कोतवाल नगर, खामला, नरेंद्र नगर, नवजीवन कॉलनी चे रहिवासी वस्तीमधील नागरीकांकरीता हे स्थानक केंद्र बिंदू ठरणार असून या स्थानकावर वयोवृद्ध तसेच विकलांग यात्रीकरू करीता विशेष सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.


इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न
पर्यटनच्या दृष्टीने रायगड किल्ला आकर्षणाचे केंद्र आहेच, त्या धरतीवर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये या किल्ल्याची काही प्रमाणात प्रतिकृती साकार करुन तेथील इतिहासाला उजाळा देण्याचा महा मेट्रो ने प्रयत्न केला आहे. छत्रपती चौक डबल डेकर उड्डाणपूल असल्याने येथील स्थानक खूप सुंदर राहणार आहे. आता पर्यंत छत्रपती मेट्रो स्थानकांवर कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्म, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तांत्रिकी खोली,टॉम,एएफओ खोली,लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम),आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक,लिफ्ट,एस्केलेटर्स,टॉयलेटचे निर्माण कार्य पूर्ण झाले असून उर्वरित कार्य जलद गतीने सुरु आहे.