Home Omicron राजस्थानात 73 वर्षांच्या वृद्धाने गमावला जीव, 7 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता...

राजस्थानात 73 वर्षांच्या वृद्धाने गमावला जीव, 7 दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

480

राजस्थानमधील उदयपूरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे हा दुसरा मृत्यू आहे. सीएमएचओ डॉ. दिनेश खराडी म्हणाले की, मृत्यू पोस्ट-कोविड न्यूमोनियामुळे झाला आहे. वृद्धांचा प्रवासाचा इतिहास नव्हता. तसेच 21 आणि 22 डिसेंबर रोजी तपासात ते निगेटिव्ह आले. 25 डिसेंबर रोजी त्यांच्या रिपोर्टमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याची पुष्टी मिळाली होती.

डॉ.दिनेश खराडी यांनी सांगितले की, त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब व हायपोथायरॉईडीझमचा त्रास होता. अशा स्थितीत विषाणू शरीरावर परिणाम करतात. तसेच, जर तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल तर धोका अजुनच वाढतो. राजस्थानमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 69 रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन बाधितांच्या बाबतीत राजस्थान देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

उदयपूरात ओमायक्रॉनचे आतापर्यंत 4 प्रकरणे समोर आली आहेत. 27 डिसेंबरला उदयपूरमध्ये ओमायक्रॉनचे नवीन प्रकरण समोर आले होते. यापूर्वी 25 डिसेंबरला तीन प्रकरणे उदयपूरात समोर आली होती. यामध्ये पती, पत्नी आणि 68 वर्षीय महिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आली होती. तर 73 वर्षीय वृद्ध ओमायक्रॉन पॉझिटिव्ह येणारी चौथी व्यक्ती होती.