राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या सुरुवातीला मोठी घोषणा केली आहे. गाड्यांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिकच असतील, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, हा निर्णय याआधीच राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.