Home Nagpur शांतीवन चिंचोलीत, धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उदघाटन सोहळा संपन्न

शांतीवन चिंचोलीत, धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उदघाटन सोहळा संपन्न

709

नागपूर ब्युरो : परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि नागपूरची धम्मदीक्षा ज्यांनी घडविली असे नागपूरचे महान सपुत्र दिवंगत धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांच्या 100 व्या जन्म दिवसानिमित्त वर्षभर चालण्याऱ्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे उदघाटन सोहळा 1 जानेवारी 2022 ला शांतीवनात भारतीय बौद्ध परिषद यांच्या वतीने साजरा केला गेला.

या समारंभाचे उदघाटन डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई यांनी धम्मसेनापती यांच्या धम्मदीक्षा करिता एकूण केलेले प्रयत्न व नागपुरी संत्री कशी उपयोगी ठरली याबद्दल विस्तृत माहिती मार्गदर्शन केले व सोहळ्याचे उदघाटन झाले असे जाहीर केले. या समारंभाचे अध्यक्ष स्थान आयु. चंद्रशेखर गोडबोले यांनी भूषविले होते.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी, म्हणून डॉ. तनोज मेश्राम , माजी सनदी अधिकारी, डॉ. रमेश शंभरकर प्राध्यापक रातुम नागपूर, डॉ. विकास जांभुलकर, प्राध्यापक रातुम नागपूर, यांनी या प्रसंगी आपले महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची सुरवात सकाळी 11 वाजता बुद्ध वंदनेने झाली. भदंत नागराजा चेन्नई व भदंत कौडिण्य नागपूर यांचे हस्ते पार पडली. या नंतर दुपारी 12 उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध. वामनराव गोडबोले लिखित, (चतुर्थ आवृत्ती) “बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भगवान बुद्धांचे रेखीव चित्रांचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर भीमबुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम दीपक बन्सोड आणि संच यांनी सादर केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तसेच संचालन प्रदीप लामसोंगे तर भारतीय बौद्ध परिषद वतीने आभार डॉ. सरोज आगलावे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जीवने, प्रा. शशी राऊत, प्रकाश सहारे, संजय चहांदे, चांद्रमनी लावत्रे, इत्यादींनी परिश्रम घेतले.