Home कोरोना #Covid_19 | बाहुबलीच्या ‘कटप्पा’ यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

#Covid_19 | बाहुबलीच्या ‘कटप्पा’ यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

517

नवी दिल्ली ब्युरो : बॉलीवूडसोबतचं आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाहुबली(Baahubali)चित्रपटामध्ये कटप्पा नावाने ओळखले जाणारे दाक्षिणात्य दिग्गज स्टार सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनोशी लढत आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याआधी सत्यराज होम आयसोलेशनमध्ये होते.

चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकृतीत सुधारणा झाली नसल्‍याने त्यांना 7 जानेवारी रोजी, शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यासंदर्भात सत्‍यराज यांच्‍याकडून कुठलीही अधिकृत माहिती किंवा स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. 67 वर्षीय सत्यराज यांची प्रकृती सुधारण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

दिग्गज अभिनेते सत्यराज तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपट बाहुबलीमध्ये कटप्पाच्या भूमिकेने त्यांना संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवून दिली.



1978 मध्ये ‘सत्तम एन कायल’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सावी’ हा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. त्यांनी प्रदीर्घ काळ प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘कटप्पा’च्या भूमिकेने त्याला संपूर्ण देशात वेगळी ओळख मिळाली.