Home कोरोना 65 कोटी लोकांना दोन्ही डोस, 11 कोटी लोकांचा एकही नाही

65 कोटी लोकांना दोन्ही डोस, 11 कोटी लोकांचा एकही नाही

512

15 वर्षांवरील पात्र लोकसंख्येपैकी 90.41 कोटी लोकांना दिला 1 डोस

देशात कोरोनापासून बचावासाठीच्या लसीकरणाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. 16 जानेवारी 2021 पासून शनिवारपर्यंत लसीचे 156 कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात 94 कोटी प्रौढ व 15 ते 18 वयोगटातील 7.40 कोटी किशोरवयीन मुले आहेत. ते पकडून देशात लसीसाठी 101.40 कोटी लोकसंख्या पात्र आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, यापैकी 64.31% म्हणजे, 65.21 कोटी लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. तर 89.16% म्हणजे, 90.41 कोटी पात्र लोकांचा सिंगल डोस झाला आहे. तथापि, 10.99 कोटी लोकांनी एकही डोस घेतलेला नाही, तर 25.19 कोटी लोकांचा दुसरा डोस बाकी आहे. 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत आजवर 38 लाख प्रिकॉशन डोस दिले आहेत.

देश डोस/लाख लोक

  • यूके 1.99 लाख
  • इटली 1.95 लाख
  • फ्रान्स 1.93 लाख
  • स्पेन 1.84 लाख
  • यूएस 1.75 लाख