Home मराठी Maharashtra । अनिल देशमुखांशी संबंधित बारा ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम

Maharashtra । अनिल देशमुखांशी संबंधित बारा ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम

583

१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे. देशमुखांशी संबंधित सीएंसह इतर बारा ठिकाणी शनिवारी सकाळी सीबीआयने सर्च ऑपरेशन सुरू राबवले. तब्बल साडेचार तास ही कारवाई सुरू होती. विशाल खटवानी या सीएसह देशमुखांचे भागीदार सुधीर बाहेती यांच्यासह इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

छाप्यासाठी दिल्ली, मुंबई येथील सीबीआय अधिकाऱ्यांसह १० पथके तयार करण्यात आली होती. नागपूर महिला पोलिसांचे एक पथकही सोबत घेतले होते. शनिवारी सकाळी ७ वाजता सीबीआय पथक कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये सीएच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. काही कागदपत्रे ताब्यात घेतली. डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधित ही धाड असल्याची माहिती आहे.