वाशिम ब्युरो : लग्नाला गेलेल्या वऱ्हाडी पीक अप ला अपघात होऊन एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार तर 9 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शेलू बाजार – वाशिम रस्त्यावर घडली आहे.
जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेलू बाजार वरून वाशिम ला येत असतांना पीक अप या प्रवाशी वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला सोयता नजीक जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला या अपघातात सावंगा जहांगीर येथील एकाच कुटुंबातील भारत शंकर गवई,पूनम भारत गवई,सम्राट भारत गवई आणि रितिका भारत गवई हे चार जण जागीच ठार झालेत तर इतर 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोला इथं पाठविण्यात आलं आहे.
अपघात घडल्या नंतर वाहनाचा चक्का चुर झाल्यावर वाहनातील जखमींना वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन चमू ने काढून वाशिम च्या हॉस्पिटलमध्ये पाठविले. विशेष म्हणजे अपघात घडलेले ठिकाण सोयता आणि मृतक असलेल्या कुटुंबाचे गावं सावंगा जहांगीर या दोन गावांचे अंतर अगदी 4 किलो मीटर आहे. मात्र नियतीने घर येण्या अगोदरच घाला घालून चारही जणांना यमसदनी पाठविले.