अबॅकस मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
नागपूर ब्यूरो: जिनियस चॅम्प्स अकादमी, रघुजीनगर नागपूरतर्फे महाराष्ट्रातील जिनियस चॅम्प्स अॅकेडमी शाखेतर्फे लेवल एक ते लेवल सहा पर्यंत अबॅकस स्पर्धा ३० जानेवारी २०२२ रोजी सुविधेनुसार ऑफलाईन व आभासीद्वारे घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास १२० विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला.
शिवजन्मोत्सव दिनी अॅबकस स्पर्धेच्या निकाल जाहिर करण्यात आला. जिनियस चॅम्प्स अकादमीचा संचालिका डॉ. जयश्री घाटबांधे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित विद्याथ्र्यांना तसेच महाराष्ट्रातील सहभागी विद्याथ्र्यांना शिवाजी महाराजांचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच अभ्यासात हुशार असणा-या विद्याथ्र्यासाठी अबॅकस स्पर्धा महत्वाची असते. या स्पर्धेत प्रथम रॅकमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रौनक अबांडे (नागपूर), अनन्या भदाने (पुणे), अद्वैत काशीकर (पुणे), लिनता पाथोडे (नागभीड), हर्षीता हिरेकर (नागपूर), अवंती चिकाटे (नागपूर), तेजस खरकाटे (साकोली), गौरी देशपांडे (पुणे), स्वरा भुगल (भंडारा), मृणाल पुरामे (गोंदिया) सह असंख्य विद्याथ्र्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिनियस चॅम्पस शाखेच्या नेहा राऊत, दर्पणा शुक्ल, जयश्री शेंडे, दिपीका चंद्रकार, सुचिता फटींग, सोनाली कडू, दिक्षा रहाटे, हर्षाली खैरनार, विद्या खरकाटे, कोमल दळवी यांचे स्पर्धा परिक्षा यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. विद्याथ्र्यांना लहान वयात स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल विशेष (उत्तेजनार्थ) बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी विद्याथ्र्यांना मिळणारे यश नक्कीच समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
विद्याथ्र्यांसाठी अबॅकसची नि:शुल्क किट
डॉ. जयश्री घाटबांधे म्हणाल्या की, अबॅकसमुळे मुलांची एकाग्रता, लिखाणाची गती, मेंदूचा विकास, आकडेमोड जलदगतीने होते, यामुळे विद्याथ्र्यांची अभ्यासाप्रती रुची वाढते. आणि क्रियशिलतेला वाव मिळतो असे भरपूर फायदे असल्याने मुले आपल्या जीवनात ठरवलेले लक्ष्य यशस्वीपणे गाठू शकतात. यामुळे जिनियस चॅम्प्स अकादमीतर्फे 6 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना अबॅकसची किट नि:शुल्क देऊन एक आठवडा वर्ग घेण्याचे व तसेच बौद्धिक कौशल्यावर मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी विद्याथ्र्यांसह पालकांनी त्वरीत या क्रमांकावर ९४२३६३१२३८, ८७९३१५३३९७ वर संपर्क करून आपले नाव निश्चित करण्याचे आवाहन केले आहे.