Home मराठी पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा । पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन, राष्ट्रवादीचं निषेधार्थ...

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा । पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन, राष्ट्रवादीचं निषेधार्थ आंदोलन

पुणे ब्युरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करूनही माहिती दिली आहे. येथे ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. या भेटीदरम्यान ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. याशिवाय ते आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन करतील आणि सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभातही सहभागी होतील.

राष्ट्रवादीचं आंदोलन

पीएम मोदींच्या पुणे दौऱ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मूक आंदोलन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनातून निषेध केला आहे. पुणे स्थानकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी काळे कपडे अन् काळे मास्क घालत पंतप्रधान मोदींचा निषेध करण्यात आला आहे. हे पंतप्रधान देशाचे नसून केवळ भाजपचे आहेत. म्हणूनच आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते आज विकास कामांचे उद्घाटन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.