Home मराठी फडणवीसांचा गौप्यस्फोट । गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा कट, मला संपविण्याचा प्रयत्न

फडणवीसांचा गौप्यस्फोट । गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा कट, मला संपविण्याचा प्रयत्न

माझ्यासह गिरिश महाजन यांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आमच्याविरुद्ध खोटे पुरावे तयार करीत असेल तर लोकशाही आहे का? आम्हाला संपविण्याच्या कारस्थानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्यासह गिरीश महाजनांविरोधात कसा कट शिजला याचे कारागृहात व बाहेर असलेल्या लोकांचे सव्वाशे तासांचे रेकार्डींग माझ्याकडे आहे. एवढे पुरावे आहेत की त्यातून २५ वेबसिरीज तयार होतील असा गौफ्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आमदार गिरीष महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने कट रचला. त्यात शरद पवारसह अनेक मंत्री सहभागी असल्याचा गौफ्यस्फोटही त्यांनी सभागृहात केला. यासंदर्भातील ऑडीओ क्लिप त्यांनी सभागृहात सादर केली.

विधीमंडळाच्या सायंकालीन सत्रात त्यांनी सडेतोड, तडाखेबंद भाषण त्यांनी केले. फडणवीस एक एक गौफ्यस्फोट करीत होते तसे तसे सभागृहात मोठी शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करतना त्यांनी पोलखोल केली.

ते म्हणाले, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगतात.

महाविकास आघाडीच्या सुनिल गायकवाड, रविंद्र शिंदेने नाथाभाऊंशी बोलणे झाले की, गिरीश महाजनांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करीत नाही. पण मोठे साहेब सर्व पाहताहेत अशा संवादाचे व्हिडीओतील कागदावर लिहिलेले संवाद फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखविले. अ‍ॅड. प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचला. सुट बुक केला. व्हेज – नाँन व्हेज जेवण करायचे का, मदत लागली तर खडसे साहेबांची घ्या असे काही संवादही त्यांनी वाचून दाखविले. हे षंडयंत्र सरकारातील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले असा आरोपही त्यांनी केला. सरकारी वकिल अ‍ॅड. प्रवीण चव्हाण विरोधात पुरावे आहेत. गिरिश महाजनांनरील बोगस केसचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले.