Home मराठी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीस प्रकरणी भाजपचे आंदोलन सूरू, राज्यभरात नोटिसीची होळी

देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीस प्रकरणी भाजपचे आंदोलन सूरू, राज्यभरात नोटिसीची होळी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली. याविरोधात भाजप राज्यभर आंदोलनाच्या पावित्र्यात असून त्याची धग पुण्यात सुरु झाली.

आशिष शेलार यांनीही एक ट्विट करीत ही तर सरकारची बालबुद्धी असल्याचे नमुद केले आहे. फडणवीस यांना मिळालेल्या नोटीस प्रकरणी आंदोलन करतानाच या नोटीसीची भाजप कार्यकर्ते होळी करणार आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्याचा आरोप केला असा आरोप महाविकास आघाडीने त्यांच्यावर केला आहे. या प्रकरणात सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसां यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना पोलिस ठाण्यात बोलावले. पण त्यानंतर पुन्हा पोलिसांनी एक पाऊल माघार घेत फडणवीस यांच्या निवासस्थानीच जबाब घेणार असल्याचे स्पष्ट केले. आज नोटीस प्रकरणावरून भाजप कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करीत आहेत. त्याची सुरुवात पुणे येथे सुरु झाली आहे.

पुणे येथे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस येणार होते. पण त्यांचा आज मुंबईत निवासस्थानी जबाब पोलिस घेणार आहेत. त्यामुळे ते पुण्यात येऊ शकणार नाहीत. त्या धर्तीवर पुणे येथे सरकारविरोधी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या असून आंदोलनाला सुरुवात केली.

दोन हात करायला तयार राहा

देवेंद्र फडणवीस यांना कुणीही संपवु शकत नाही. राज्य सरकारने आता भाजपशी दोन हात करायला तयार राहावे. सरकारचे पाळेमुळे उखडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहोत असेही आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.