नागपूर ब्युरो : महाराष्ट्रातील अग्रगण्य व नामांकित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे नागपुरात सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 19 मार्च ते 22 मार्च दरम्यान सदर सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन शुभ मंगल कार्यालय अँड केटरर्स, भगवा घर लेआउट, धरमपेठ येथे होणार आहे. सदर प्रदर्शन सकाळी 10.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. सदर प्रदर्शनीचे उद्धाटन यमसनवार संस्कृत क्लास, धरमपेठच्या डॉ. मनीषा यमसनवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स च्या संचालकांनी दिली आहे.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ला 1965 मध्ये सुरुवात झाली. दादर वाशी मुलुंड रत्नागिरी, चिपळून, सावंतवाडी, पणजी अशा मोठ्या शहरात यांच्या शोरूम्स आहेत. प्रदीर्घ परंपरा असल्याने जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स चा आज एक खास ग्राहक वर्ग तयार झालेला आहे. ग्राहकांची आवड निवड याची माहिती असल्याने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे अनुभवी कलाकार ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सोन्याच्या वस्तूवरील मजुरीवर सदर ज्वेलर्स कडून सवलत देणे शक्य होत असते. यामुळे ग्राहकांना मनपसंत डिझाइन्स मधील दागिने निवडता येतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारचे प्रदर्शन भरविण्यात येत आहेत, जेणेकरून ग्राहकांना सोयीस्कर व्हावे.