पहिल्या दोन लाटेंपेक्षा कोरोनाची तिसरी लाट कमी प्राणघातक होती, परंतु अद्यापही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. चीनमधील सध्याची परिस्थिती आणि इस्रायलमध्ये आढळून आलेले नवीन प्रकार यामुळे सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. त्याचवेळी, आयआयटी कानपूरच्या संशोधकांनीही भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा ईशारा दिला आहे. आय.आय.टी कानपूरच्या मेडराईव्ह मासिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही लाट सुमारे तीन ते चार महिने राहणार आहे. ते किती प्राणघातक असेल याचा अंदाज अद्यापही अजून आलेला नाही.
चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढते आहे, ते ही येथे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असताना. चीनमधील जिलिन, हाँगकाँग, फुजियान, शांघाय यासारख्या 11 शहरांमध्ये वाढत्या केसेसनंतर सरकारने लॉकडाऊन घोषित केला. चीनमध्ये ‘शून्य कोविड पॉलिसी’ अवलंबूनही ओमिक्रॉनचे BA.2 सब-व्हेरियंट हे प्रकरण वाढण्याचे कारण आहे.
राजस्थानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली तर यामध्ये सर्वात जास्त धोका लहान मुलांना असू शकतो. राजस्थान राज्य कोविड व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि एस.एम.एस. हॉस्पिटलचे माजी वरिष्ठ डॉक्टर वीरेंद्र सिंह यांच्या मते, आपण अजूनही कोविड नियमांचे पान केले पाहिजे. जरी आपल्या शरीरात लसीकरणाद्वारे अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, परंतु अद्याप कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. सध्या सरकार 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील बालकांचे लसीकरण करत आहे आणि अलीकडेच 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे, परंतु या वयोगटातील बालकांना अजूनही धोका आहे.
सध्या राजस्थानमध्ये कोरोनाची फारच कमी प्रकरणे समोर येत आहेत. मार्चच्या 17 दिवसांत संपूर्ण राज्यात 2707 रुग्ण आढळले आहेत, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हानिहाय अहवाल पाहिल्यास जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1099 प्रकरणे आढळून आली आहेत. या महिन्यात जयपूरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, फेब्रुवारीच्या अहवालावर नजर टाकल्यास राज्यात 280 दिवसांत एकूण 73,395 रुग्ण आढळून आले असून 269 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.