दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ने रिलीज पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे रेकॉर्ड मोडत आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात म्हणजे केवळ तीन दिवसांत 500 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन करुन इतिहास रचला आहे. 550 कोटींहून अधिकच्या निर्मिती खर्चात बनलेला हा चित्रपट तीन दिवसांतच जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
‘RRR’ने तीन दिवसांत 500 कोटींचा टप्पा ओलांडला तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, ‘RRR’ हा भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय करून नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरण तेजा, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) 130 कोटींहून अधिक कमाई केली. याआधी, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 114.38 कोटी रुपयांचा आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) वर्ल्डवाइड 257.15 कोटी रुपयांची कमाई केली होती.
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने हिंदी त सुमारे 23.75 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे त्याची दोन दिवसांची कमाई 43.82 कोटी झाली. तर तिसर्या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला आणि कमाईत वाढ झाली. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे 31.50 कोटींचा (हिंदी व्हर्जन) व्यवसाय केला आहे, जो तिन्ही दिवसांमध्ये सर्वाधिक आहे. यानंतर, त्याची एकूण कमाई 74.50 कोटींवर गेली आहे.