Home मराठी कोरोना । पंतप्रधान मोदींनी बुधवारी 12 वाजता बोलवली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

कोरोना । पंतप्रधान मोदींनी बुधवारी 12 वाजता बोलवली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कोविड बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सर्व राज्यांमध्ये कोरोनाशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क घालणे अनिवार्य करण्यासोबतच तो न लावल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती पाहिली, तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2483 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि ब्रिटनसह जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बूस्टर डोसवरही चर्चा होणार आहे. सर्व राज्यांना बूस्टर डोससाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आतापासूनच चाचणीवर भर दिला जात आहे. या बैठकीत पीएम मोदी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही देतील.