Home Health डॉक्टरांच्या मते देशात मुस्लिमांत सर्वात कमी हायपरटेन्शन, तर शिखांमध्ये सर्वाधिक

डॉक्टरांच्या मते देशात मुस्लिमांत सर्वात कमी हायपरटेन्शन, तर शिखांमध्ये सर्वाधिक

हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाबाचा विकार देशातील शीख नागरिकांमध्ये सर्वाधिक आहे आणि मुस्लिम समुदायात सर्वात कमी. तणाव हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5’ च्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

त्यानुसार देशातील 24% पुरुष, 21% महिला उच्चरक्तदाबाने ग्रस्त आहेत. त्यातील पुरुषांमध्ये शीखधर्मीय सर्वाधिक 37%, जैन धर्मीय 30.1%, हिंदू 24% आणि मुस्लिम 21% आहेत. ज्या लोकांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण कमी आहे ते तुलनेने कमी आजारांना बळी पडतात.

उच्चरक्तदाबामुळे हृदयविकार, अर्धांगवायू, मूत्रपिंड, यकृत प्रभावित होणे, नाकातून रक्त येणे, दृष्टी कमी किंवा अंधत्व येणे यासारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. सर्वेक्षणानुसार, गंभीर आजारांचा धोका असूनही, देशातील 67% महिला आणि 53.7% पुरुषांनी कधीही रक्तदाब चाचणी केली नाही. लिंग; देशातील महिलांपेक्षा पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक आहे.