Home मराठी महंगाई डायन | महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन

महंगाई डायन | महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन

केंद्राच्या मोदी शासनाच्या धोरणांचा केला निषेध

कमलापूर च्या हत्तींना रोखण्याची ही केली मागणी

गडचिरोली ब्युरो : पेट्रोल -डिझेल व गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे फारच कठीण झाले आहे. भाजप प्रणित केंद्र शासनाने या सर्व इंधनाचे भाव कमी करावे, कमलापूर व पातानिल येथील हत्तींचे स्थानांतरण करू नये, या ठिकाणी पर्यटन विकास करण्यावर भर देण्यात यावा, आलापल्ली सिरोंचा महामार्गाच्या निर्मितीतील वन विभागाचा अडथळा दूर करावा, ओबीसींना आरक्षणासंदर्भात न्याय द्यावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी तर्फे शहरातील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून बेरोजगार युवक आणि शेतकरी यांची व्यथा मांडली. आंदोलनासमोर बैलबंड्या आणि गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

सदर आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, नागपूर विभागीय अध्यक्ष शाहिन हकीम, लीलाधर भरडकर, युनूस शेख, विवेक बावनवाडे, इंद्रपाल गेडाम, सुनील नंदनवार, अमीन लालानी, लतीफ शेख, प्रदीप हजारे, निशा ठाकरे, संध्या उईके, आरती कोल्हे, सरिता काकोडे, जामिनी कुलसंगे, आशा शिंदे, नलिनी शिंदे, अनसूया मेश्राम, सोनाली पुण्यपवार, रेखा बारापात्रे, लता शिंदे, सुनील कुमार चिमुरकर, रामदास निरंकारी, सुनील कत्रोजवार, अमर खंडारे, मारुती गावडे, बेबी लभाने, सुजाता पिपरे, रेखा कोराम, माला मेश्राम आदी उपस्थित होते.