आरोपीना शोधण्यास पोलिसांना होत आहे मदत
नागपूर ब्युरो : महा मेट्रोचा प्रवाश्याना विश्वसनीय सेवा प्रदान करण्याचा मानस असून, मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाश्यान करता महा मेट्रोने अनेक सोई-सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याच सुविधेचा महत्वपूर्ण भाग म्हणजे मेट्रो ट्रेन आणि स्टेशन परिसरात उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरा ज्यामुळे तेथील घडत असलेल्या सर्व घटना या कॅमेरा मध्ये कैद होत असून या कॅमेरामुळे पोलीस विभागाला आरोपींना पकडण्यास मदत मिळत आहे. नुकतेच लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथील लिफ्ट मधून महिला प्रवासीच्या पर्स मधून दागिने पळविणाऱ्या आरोपींना सीसीटीव्हीच्या माध्यमाने आरोपींना शोधून काढण्यास पोलीस विभागला मदत झाली.
महिला परिचारिकेची टू-व्हीलर चोरीची घटना
दुसरी घटना अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन जवळील किमया हॉस्पिटल मध्ये कार्यरत महिला परिचारिका यांची ज्युपिटर टू-व्हीलर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली सदर महिला या हॉस्पिटल मध्ये कार्यरत असून तिने हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये दुचाकी पार्क केली होती व मध्यरात्री १२.३० च्या सुमारास टू-व्हीलर चोरी झाल्याचे मेट्रो कॅमेरा मध्ये कैद झाले व पुनः एकदा पोलीस विभागाला आरोपी शोधून काढण्यास मदत झाली.
१ लाख ९० हजार रुपये चोरी करतानाची दृश्य कॅमेरा मध्ये कैद
दौसर वैश्य चौक स्टेशन परिसरात एका व्यक्तीचे १ लाख ९० हजार रुपये चोरी केल्याची घटना कैद झाली, सदर व्यक्तीचे दौसर वैश्य चौक स्टेशन परिसरात कबाडीचे दुकान असून रात्री या ठिकाणीच झोपलेला असता आरोपीने याचा फायदा घेत, या व्यक्ती जवळील १ लाख ९० हजार रुपये चोरी केल्याची घटना कॅमेरा मध्ये कैद झाली या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गणेशपेठ पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
या सोबतच अन्य अपहृय घटना मेट्रो स्टेशन तसेच या ठिकाणहून जात असतांनाची मेट्रो स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद होत असून पोलीस विभागाला आरोपीना शोधण्यास मदत होत आहे.