Home Nagpur #Maha_Metro | ट्रेन रॅपिंगला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद

#Maha_Metro | ट्रेन रॅपिंगला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद

मेट्रो ट्रेनवर जाहिरात प्रदर्शित करण्याची उत्तम संधी

नागपूर ब्युरो : महा मेट्रोने ट्रायल रन होण्यापूर्वीच नॉन-फेअर रेव्हेन्यू बॉक्सची संकल्पना राबवत असून, नॉन-फेअर रेव्हेन्यू बॉक्सच्या विविध घटकांमध्ये ‘ट्रेन रॅपिंग’ देखील समाविष्ट केले आहे. एक अनोखी संकल्पना ज्यामध्ये एखाद्या कंपनीचे विविध बाबी प्रदर्शित करण्यासाठी संपूर्ण मेट्रो ट्रेनचा वापर केला जाऊ शकतो.

आतापर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र,भारतीय जीवन विमा निगम (LIC) सारख्या नामांकित संस्थांनी या संधीचा लाभ घेतला असून त्यांची अनेक उत्पादने मेट्रो ट्रेनच्या बाह्य भागात प्रदर्शित करण्यात आली आहेत. अँक्वा आणि ऑरेंज लाईनवर धावणाऱ्या २ मेट्रो ट्रेन वर एलआयसीचे रॅपिंग करण्यात आले असून महा मेट्रो आणि एलआयसी यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त, छत्तीसगड सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे २ मेट्रो ट्रेनवर रॅपिंग करण्यात आले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत ४ गाड्या जाहिरातींद्वारे रॅपिंग करण्यात आले आहेत. ट्रेन रॅपिंग वर जाहिरात करण्याचा कालावधी ३ वर्षांकरिता असून महा मेट्रोद्वारे लवकरच मेट्रो ट्रेन वर जाहिरात रॅपिंग करिता निविदा मागविण्यात येणार असून स्थानिक व्यापारी वर्गाने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महा मेट्रो करीत आहे.

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी या ऑरेंज व अँक्वा लाईनवर प्रवासी सेवा सुरु असून सरासरी ४५,००० नागरिक मेट्रो ट्रेनमधून प्रवास करत आहे त्यामुळे कंपन्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. नागरिकांची मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता, ट्रेन रॅपिंगद्वारे जाहिरात करून संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.