Home Business नोटांवर दिसू शकतात टागोर-कलाम : पहिल्यांदाच छापणार महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांचा फोटो

नोटांवर दिसू शकतात टागोर-कलाम : पहिल्यांदाच छापणार महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांचा फोटो

भारतीय चलनावर म्हणजेच रुपयावर महात्मा गांधींचा फोटो आहे. पण लवकरच नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर आणि देशाचे 11 वे राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क फोटो काही नोटांवर दिसू शकतात. वृत्तानुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोटांच्या मालिकेवर कलाम आणि टागोर यांचा वॉटरमार्क वापरण्याचा विचार करत आहे.

टागोर यांना त्यांच्या गीतांजली या काव्यात्मक रचनेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर कलाम हे देशातील महान वैज्ञानिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. नोटांवर या व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे छापली गेली, तर रुपयावर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांचा फोटो छापण्याची रिझर्व्ह बँकेची पहिलीच वेळ असेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयआयटी-दिल्लीचे एमेरिटस प्रा. दिलीप टी. साहनी यांना गांधी, टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्कचे दोन वेगवेगळे नमुने पाठवण्यात आले आहेत. साहनी यांना दोन संचांमधून निवडण्यास आणि सरकारच्या अंतिम विचारासाठी ठेवण्यास सांगितले आहे. वॉटरमार्कची तपासणी करणारे प्रा. साहनी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तज्ज्ञ आहेत. याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.