दहा दिवस विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर ब्युरो : विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने यंदापासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत गायत्रीनगर येथील व्हीआयपीएल आयटी पार्कच्या आवारात “व्हीआयपीएलचा राजा” ची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याअनुषंगाने 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला श्रीगणेशजींच्या स्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होईल. गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी 4 वाजता वारकरी भजन आयोजित करण्यात आले असून 2 सप्टेंबरला सायंकाळी 7.30 वाजता ‘हसते रहो कॉमेडी शो’ होणार आहे. यात राजकुमार रँचो, राहूल इंगळे व अहसान कुरेशी यांचा सहभाग राहील. शनिवारी, 3 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता इंडियन आयडॉल फेम शन्मुख प्रिया यांची ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ होणार आहे तर 4 तारखेला रविवारी दुपारी 5 वाजता ‘जो जिता वही सिकंदर’ या ‘व्हीआयपीएलच्या कर्मचा-यांच्या अंतर्गत स्पर्धेची पहिली फेरी होईल. या स्पर्धेची अंतिम फेरी 5 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार, 6 सप्टेंबर सायंकाळी 7.30 वाजता ‘पंचम भावगीत संध्या’ हा संगीतमय कार्यक्रम सचिन व सुरभी ढोमणे सादर करणार आहेत. 7 तारखेला सायंकाळी 7.30 वाजता भजन संध्या व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. 8 तारखेला सकाळी 11.30 वाजता कथा हा ‘व्हाईस ऑफ नागपूर’ चा कार्यक्रम होणार असून हा सर्वांसाठी खुला आहे. 9 तारखेला दुपारी 1 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 6 वाजता गणेश विसर्जन होणार आहे.
गणेशोत्सवात दररोज सकाळी 11 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन व्हीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे व अध्यक्ष ज्योत्स्ना प्रशांत उगेमुगे यांनी केले आहे.