Home मराठी जयंतराव पाटील यांनी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

जयंतराव पाटील यांनी गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

490

गड़चिरोली ब्यूरो: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आज गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी मा. प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे. या भागात चांगली नोंदणी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपले राजकारण बेरजेचे असल्याने आपल्या पक्षाची दारं सदैव येणाऱ्यांसाठी उघडी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत, असे मार्गदर्शन जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

या प्रसंगी अहेरी विधानसभा चे आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवीभाऊ वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भराडकर, युवक प्रदेशाध्यक्ष नितीन भरारकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश पोरंडीवार, बबलू भैया हकीम आदींसह पक्ष नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.