दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रोषणाई केली जाते. लोक खोल्या, लॉबी, रेलिंग आणि घराच्या गेटपाशी पणत्या म्हणजेच दिवे लावतात आणि घराला लायटिंगने रोषणाई करतात. एवढेच नाही तर दुकाने, कार्यालये, कारखाने यांसारखी कामाची ठिकाणेही देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी उजळून निघतात. पण अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. दिवाळीच्या रात्री या ठिकाणी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.
दिवाळीहा दिव्यांचा सण आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर उजळून निघते. दिवाळीच्या दिवशी घरात आणि घराबाहेर काही अशा जागा असतात जिथे पणत्या लावून रोषणाई करणं शुभ मानलं जातं. या ठिकाणी पणत्या लावल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या रात्री कोण-कोणत्या ठिकाणी दिवे लावावेत.
लोक घरातील पूजेच्या ठिकाणी अनेक दिवे लावतात पण बाहेर मंदिरात दिवा ठेवायला विसरतात. मंदिरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या रात्री घराजवळील मंदिरात दिवा लावावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
दिवाळीच्या रात्री तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही कोणत्याही रोपाजवळ दिवा लावू शकता. यामुळे घरात सौभाग्य येते.
दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे म्हटले जाते की असे केल्याने यम आणि शनी दोष दूर होतात आणि धनाची प्राप्ती होते.
घराच्या दाराजवळ म्हणजेच उंबरठ्यावर दिवा लावणेदेखील खूप महत्वाचे आहे. यामुळे अनेक समस्या दूर होतात आणि घरात समृद्धी येते. त्यामुळे दिवाळीच्या रात्री मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत.
घरातील कचरा ज्या ठिकाणी जमा होतो तो म्हणजे डस्टबिनजवळही दिवाळीच्या रात्री दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
Interview | पुन्हा भाजपने मला संधी दिली तर समाजकार्यासाठी त्या संधीचे सोने करेन
Deepawali 2022 | नरक चतुर्दशी क्यों मनाई जाती है? जानें इसका महत्व