Home Legal Highcourt l पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता, कोणताही गुन्हा नाही

Highcourt l पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता, कोणताही गुन्हा नाही

414

मुंबई ब्यूरो : कारण नसताना पोलिसांनी बेदम मारलं चुकीच्या कारणासाठी पोलिसांनी शिवीगाळ केल्याच्या घटना आपण नेहमी पाहत असतो. परंतु पोलिसांनी निष्कारण त्रास देत मारहाण केल्याचा आपल्याकडे कोणताच पुरावा नसल्याने आपल्याला यावर काहीही करता येत नाही. दरम्यान यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्याने पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यास तो गुन्हा ठरू शकत नाही असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. यामुळे पोलीस ठाण्यात छळवणूक करताना तुम्ही व्हिडीओ केल्यास त्याची दाद मागता येणार आहे.

  1. मुंबई मुंबई हायकोर्टाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकाल दिल्याने अनेकांना याचा फायदा होणार आहे. पोलीस स्‍टेशन हे ‘गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत’ (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही. त्‍यामुळे पोलीस स्‍टेशनमध्‍ये केलेले व्‍हिडीओ रेकॉर्डिंग गुन्‍हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.