नागपूर ब्युरो : परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महाप्रयाण दिनानिमित्त शांतिवन चिंचोली येथे अभिवादन करण्याकरिता मोठा जनसागर जमलेला होता. करोना काळातील सर्व निर्बंध उठविल्यानंतर दोन वर्षानी जनतेला अभिवादन करण्याची संधी मिळाली. आज सकाळी 10: 00 शांतीवन येथील बाबासाहेबच्या अस्थीकलशाला मानवंदना भारतीय बौद्ध परिषदेच्या पदाधिकारी आणि पूज्य भन्ते कौन्डीण्य यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
दुपारी 1 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धम्मसेनापती वामनराव गोडबोले, नानकचंद रत्तू, महादायिका गोपिकाबाई ठाकरे यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
सभा अध्यक्ष स्थानी प्रल्हाद खोब्रागडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त समाजकल्याण त्याच बरोबर निलेश बुचूडे, प्रा. संजय कानिंदे, आशिष वासनिक, प्रशिक वासनिक, सुनील हूड, प्रा. शशीकांत राऊत, इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्तित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले.
प्रस्ताविकात शांतिवन चिंचोली चा संपूर्ण इतिहास व होण्याऱ्या प्रकल्प विकासात होणारी प्रगती व प्रकल्प करिता लागणाऱ्या 157 कोटी चा प्रस्ताव केंद्रशाशनाकडे प्रास्तावित केल्याची माहिती दिली. प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याकरिता शासन स्तरावर प्रयन्त सुरु आहे अशी माहिती दिली. प्रमुख पाहुणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदरीत जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप लामसोंगे, तर आभार चंद्रशेखर गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश सहारे, संजय चहांदे, मोतीलाल नाईक, मनोहर भांगे,चंद्रमनी लावत्रे, राजेश नानवटकर, मानिक निकोसे, जयंता टेम्भूरकर, हरीश वंजारी, प्रवीण पाटील, धर्मपाल दुपारे, राहूल भैसारे, यांनी प्रयन्त केले.