Home हिंदी #Nagpur | खासदर क्रीडा महोत्सव स्केटींग मध्ये सान्वी सरोदे ला सुवर्णपदक

#Nagpur | खासदर क्रीडा महोत्सव स्केटींग मध्ये सान्वी सरोदे ला सुवर्णपदक

369

नागपूर ब्यूरो: फ्रीडम पार्क येथे पार पडलेल्या स्केटींग चॅम्पीयन्यशिप स्पर्धेमध्ये कु. सान्वी राजेश सरोदे हिने 10 वर्षाच्या आतील मुलींच्या गटात श्री साई स्केटींग अ‍ॅकेडमी, नरेंद्र नगर नागपूर कडुन प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये सान्वी हिने सुवर्ण पदक प्राप्त करत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. याआधी सुद्धा महाराष्ट्र एन्ड्यूरन्स स्केटींग ग्रुप च्या वतीने खोपोली, जि. रायगड येथे 10 व 11 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 2 मिनीट तथा 1 मिनीट या प्रकारात सान्वी सरोदे हिने दोन कास्यपदक पटकाविले आहे. सान्वी सरोदे तिच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील मनीषा सरोदे, राजेश सरोदे तसेच श्री साई स्केटींग अ‍ॅकेडमी, नरेंद्र नगर चे संचालक व हेड कोच प्रशांत मालेवार सर तसेच अमोल सर यांना देत आहे.