Home मराठी #media l ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर वन पत्रकारांची संघटना!

#media l ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर वन पत्रकारांची संघटना!

 महाराष्ट्रात चार हजारांहून अधिक सदस्य ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या परिवारात!

दिल्ली (प्रतिनिधी) : देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेत तब्बल सव्वीस हजार तीनशे बारा नवीन सदस्य सोडले गेले आहेत. महाराष्ट्रात हा आकडा साडेचार हजारांहून अधिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पत्रकार, पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबवणाऱ्या देशातल्या सगळ्या पत्रकारांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला आपल्या हक्काची चळवळ बनवली. ऑनलाईन सदस्य नोंदणीच्या माध्यमातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या परिवाराची ताकद मोठी झाली. सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यामध्ये पूर्णतः देशभरात ऑनलाईन पद्धतीने सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिल्ली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण राज्यात आपल्या विचार आणि कृतिशील कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांचा परिवार बनवून त्या परिवारासाठी कृतिशील कार्यक्रम आखण्यामध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पत्रकारिता आणि पत्रकारांचे कल्याण अशी महत्त्वपूर्ण भूमिका घेत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ची वाटचाल मोठ्या गतीने सुरू झाली. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांचे घर, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्ती नंतरची मदत, या प्रश्नांवर थेट कृतिशील कार्यक्रम राबवला गेले. महाराष्ट्रामध्ये बुलढाणा या ठिकाणी अनेक पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आले. ते यशस्वी झाले आणि तेच प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत राबवले गेले. महाराष्ट्रामध्ये राबवलेले प्रयोग देशातल्या अनेक राज्यांत राबवण्यात आले. पत्रकारांसाठी हक्काची विचारधारा आणि कृतिशील कार्यक्रम, यामुळे देशातील सर्वच राज्य ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या माध्यमातून व्यापले गेले. कृतिशील कार्यक्रम आणि हजारो पत्रकारांचे पाठबळ यातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ देशातील नंबर वन पत्रकारांची संघटना झाली.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, मंदार फणसे, फिरोज पिंजारी, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, सचिव दिव्या पाटील यांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या सध्या सुरू असलेल्या कारकिर्दीबद्दल विस्ताराने माहिती दिली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची कार्यप्रणाली देशातल्या तळागाळात असणाऱ्या त्या प्रत्येक पत्रकाराने स्वीकारली. नियमित होणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे कार्य प्रत्येक पत्रकारापर्यंत पोहचले. आता अजून या कामाला गती येणार आहे, असेही ते म्हणाले.

येत्या ३० एप्रिलला महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्याच राज्यांची संघटनात्मक बांधणी, उपक्रम आढावा हे दोन्ही कार्यक्रम संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर अजून थेट कृतिशील कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पत्रकार समन्वय समिती, त्या त्या राज्याचे सरकार, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’शी संबंधित असणारा प्रत्येक सदस्य या कृतिशील कार्यक्रमांमध्ये उतरणार आहे. लवकरच दिल्लीमध्ये देशभरामधल्या सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याची माहितीही संदीप काळे यांनी दिली. सर्व देशात ऑनलाईन पद्धतीने सदस्य नोंदणी केली गेली. सध्या सुरू असलेला एप्रिल महिना पूर्णतः सदस्य नोंदणीचा महिना असणार आहे. नव्याने येणाऱ्या, जुन्या राहिलेल्या पत्रकार असणाऱ्या सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने सोबत दिलेल्या लिंक https://forms.gle/RCR2vyeQGew6eCc76 वर सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या केंद्र आणि सर्व राज्याच्या वतीने करण्यात आले आहे. लगेच प्रमाणपत्र आणि सदस्य असल्याचा फायदाही नोंदणी केल्यावर मिळणार आहे.