Home हिंदी नागपूर अधिवेशनाचा निधी कोव्हिड उपचारासाठी खर्च करा : आ. विकास ठाकरे

नागपूर अधिवेशनाचा निधी कोव्हिड उपचारासाठी खर्च करा : आ. विकास ठाकरे

753

नागपूर ब्यूरो : राज्य विधिमंडळाचे येत्या 7 डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत (नागपूर) घेण्याऐवजी यावर खर्च होणारा निधी नागपूर आणि विदर्भात कोव्हिड उपचारासाठी, आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

अधिवेशनावर होतो कोट्यवधींचा खर्च

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या प्रदीर्घ पत्रात ‌आ. विकास ठाकरे यांनी कोरोनामुळे झालेली विदारक स्थिती आणि तोकड्या आरोग्य यंत्रणेचे दाहक वास्तव मांडले आहे. ते म्हणतात की, गेल्यावर्षी 6 दिवसांच्या अधिवेशनावर 75 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे. रोज 13 कोटी म्हणजे दर तासाला 1 कोटी 62 २ लाख आणि मिनिटाला 2 लाख 70 हजार रुपये खर्च झाला. कोरोनामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडली आहे. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा अभाव आहे. सर्वत्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधिवेशनासाठी दिले नोटिस

शहरात रोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. 60 हजारांहून अधिक रुग्ण असून सुमारे 1900 पेक्षा जास्त नागरिकांचे मृत्यू झाले. मनपा तील 385 कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्तांनी कोव्हिडबाबत घेतलेल्या निर्णयास खासगी रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. रुग्णालयाचे शुल्क निर्धारित करण्याचा सरकारला अधिकार नसल्याचा दावा केला आहे. मेयो व मेडिकलमधील 150 डॉक्टर बाधित आहेत. महापालिकेकडे नोंद असलेल्या 637 खासगी रुग्णालयांपैकी 33 मध्ये 407 आयसीयू व 122 व्हेंटिलेटर आहेत. शहरात ही स्थिती असताना कोव्हिड सेंटर असलेले आमदार निवास व दीडशे कर्मचारी राहात असलेले 160 गाळे रिकामे करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिस दिले आहे. दीडशे कर्मचाऱ्यांना अशा स्थितीत भाड्याने कुठे घर मिळणार, असा सवालही आ. ठाकरे यांनी केला आहे.

कुणालाच नको अधिवेशन

सरकारी आदेशामुळे प्रशासनही हतबल आहे. अधिवेशनावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याऐवजी नवीन रुग्णालय उभारता येईल. सद्यस्थितीत वैदर्भीय जनतेलाच अधिवेशन नको, याउलट नागपूरच्या गेल्या अधिवेशनात किती प्रश्न निकाली निघाले, असा संताप व्यक्त करण्यात येत असल्याकडेही आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? अबतक नहीं किया है तो अभी क्लिक करें (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.