Home हिंदी बेड वाढवणार पण मॅन-पावर कुठून आणणार? आ.कृष्णा खोपडे

बेड वाढवणार पण मॅन-पावर कुठून आणणार? आ.कृष्णा खोपडे

1026

आरोग्य मंत्री टोपे यांच्या आदेशावर आ.कृष्णा खोपडे यांचा सवाल

नागपूर ब्यूरो : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागपूर दौ-यावर मेडिकलमध्ये बेड वाढविण्याचे आदेश दिले खरे, मात्र बेड वाढविल्यास त्यासाठी लागणारे डॉक्टर्स व अन्य आवश्यक मॅनपावरची पूर्तता करणे तितकेच गरजेचे आहे. सद्यस्थितीत मेडिकलमध्ये 600 बेड्स आहेत, मात्र त्यानुसारच मॅनपावरचा भयंकर तुटवडा असतो. नर्सेस व अन्य कर्मचा-याचे कमतरतेमुळे मेडिकलमध्ये रुग्णांचे बेहाल आहेत, रुग्णांचे नातेवाईकांना स्ट्रेचर खेचून न्यावे लागते. ऑक्सिजन व वेंटीलेटरची मोठी कमतरता आहे. 600 बेडवर असलेल्या रुग्णांना कशी उत्तम व्यवस्था देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इकडे मेयो-मेडिकल सारख्या शासकीय रुग्णालयात योग्य व्यवस्था नाही तर तिकडे खाजगी रुग्णालयात लुटमार सुरु आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती असून कुठे उपचार करावा, हेच कळत नाही. त्यामुळे मेयो-मेडिकलमध्ये आरोग्यव्यवस्था उत्तम करण्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

यापूर्वी महानगर पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर रोडवर 5000 बेडचे जम्बो हॉस्पिटलचे निर्माण केले होते. मोठा प्रपोगंडा त्यांनी माध्यमांना हाती घेऊन केला होता. मात्र डॉक्टर्स व अन्य सेवेच्या अभावी संपूर्ण जम्बो हॉस्पिटलची कशी दैनावस्था झाली, हे नागपूरकरांना माहित आहेच. आधीच आर्थिक तंगीचा सामना करीत असलेल्या महानगर पालिकेला कोट्यावधीचा फटका यामुळे बसला. मात्र या जम्बो हॉस्पिटलमध्ये एकाही रुग्णाचा उपचार झाला नाही, हे दुर्दैव.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).