Home हिंदी संरक्षण विभागातील मुलींना कौशल्य विकासातून आत्मनिर्भर करणार

संरक्षण विभागातील मुलींना कौशल्य विकासातून आत्मनिर्भर करणार

807

एड. यशोमती ठाकूर यांचा बाल विकास गृहातील मुलींसोबत मुक्त संवाद

नागपूर : महिला व बाल विकास सरंक्षण गृहातील महिला, मुली तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या महिला व मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी न्यायालय, पोलीस तसेच महिला व बाल विकास विभाग यापुढे समन्वयाने काम करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी शासकीय मुलींचे वसतिगृह, प्रियदर्शनी महिला वसतिगृह तसेच करुणा होमला भेट देवून येथील मुली व महिलांसोबत संवाद साधला. बाल विकास संरक्षण गृहात मुली व महिला सोबतच 6 ते 18 वयोगटातील अनाथ व पीडित बालकांचा समावेश असून यासोबतच इतर राज्यातील घर सोडून आलेल्या मुली, अनैतिक व्यापार प्रतिबंध नियमांतर्गत संरक्षण दिलेल्या मुलींचा समावेश आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी काटोल रोडवरील शासकीय मुलींचे बालगृह, सरस्वती शासकीय महिला वसतिगृह (मतीमंद), शासकीय महिला करुणा वसतिगृह तसेच शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे भेट देवून तेथील व्यवस्थेचा माहिती घेतली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).