Home हिंदी गरज संस्थेने दिला माणुसकिचा संदेश, निराधार आजी ला मदतीचा हात 

गरज संस्थेने दिला माणुसकिचा संदेश, निराधार आजी ला मदतीचा हात 

775

नागपूर ब्यूरो : गरज बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था, नागपूर च्या माध्यमातून टिमकी हनुमान मंदिर परिसरातील दुर्गा मंदिरात असहाय्य अवस्थेत राहत असलेल्या आजी रेखा बिलगे वय 60 वर्ष यांना संस्थेनी मदतीचा हात देत, त्यांना नालंदा वृध्द आश्रम, रानी दुर्गावती चौक येथे प्रवेश मिळवून दिला.

संबंधित महिलेची माहिती संस्थेला कळताच संस्थेने सदर ठिकाणी भेट दिली. रेखा बिलगे, संस्थेच्या कार्यकर्त्यांना अत्यंत दयनीय परिस्थितीत सापडल्या, सुत्र्याच्या मध्यमा तून संस्थेला ही माहिती मिळाली की त्या कित्येक दिवसांपासून निराधार व लकवा ग्रस अवस्थेत तेथे वास्तव्य करीत आहेत. समुदायातील लोक त्यांना जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करायचे परंतु त्यांचा छताची व्यवस्था आजपर्यंत होऊ शकली नाही व त्यांना या थंडी मध्ये रस्त्यावर राहवे लागणार होते.

संस्थेच्या पुढाकाराने गुरुवार (15 ऑक्टोबर) ला रेखा विलगे तसेच वृध्दाश्रमातील इतर महिला यांचे मोतिया बिंदुचे ऑपरेशन निःशुल्क स्वरूपात करवून देण्यात येत आहे. या मानवतेच्या कार्यात दाता तसेच नालंदा वृद्धाश्रमातील अध्यक्ष बेबीताई रामटेके व टीम, तसेच गरज बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष मिनुश्री रावत, अंकित साकोरे, मोनाली गेडेकर व टीम यांचा अमूल्य योगदान लाभलेला आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).